डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मो फराह आणि सिफान हसन यांची दमदार कामगिरी

मो फराह आणि नेदरलँड्सची सिफान हसन यांनी डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.  तसेच त्यांनी चार वेळा ऑलिम्पिक विजेतेपद पटकावले आहे.

ऑलिम्पिक विजेतेपद पटकावणाऱ्या मो फराह आणि नेदरलँड्सची सिफान हसन यांनी डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.  तसेच त्यांनी चार वेळा ऑलिम्पिक विजेतेपद पटकावले आहे. एक तासाच्या शर्यतीत नव्या विक्रमांची नोंद केली. रिकाम्या स्टेडियममध्ये ब्रिटनच्या फराहने पुनरागमन करताना एक तासामध्ये २१,३३० मीटरचे अंतर पार केले.

फराहने २०१७ मध्ये रस्त्यावरील शर्यतीत भाग घेणे थांबवले होते, पण पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये १० हजार मीटरचे जेतेपद कायम राखण्यासाठी त्याने पुनरागमनचा निर्णय घेतला. सिफान हसनने महिलांच्या शर्यतीत १८,९३० मीटर इतके अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला.