मुंबईचा राजस्थानवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

मुंबईने हे विजयी आव्हान १८.३ ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक नाबाद ७० धावा केल्या. तसेच कृणाल पंड्याने ३९ धावांची खेळी केली.

    दिल्ली : मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते.

    मुंबईने हे विजयी आव्हान १८.३ ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक नाबाद ७० धावा केल्या. तसेच कृणाल पंड्याने ३९ धावांची खेळी केली.

    राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (arun jaitley stadium delhi) करण्यात आले होते.