मुंबईला दुसऱ्या विजयाची आस, हैदराबादला टाळायचीय पराभवाची हॅटट्रिक, कोणता संघ बाजी मारणार?

डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला मात्र कोलकाता नाइट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत पराभवाच्या हॅटट्रिकपासून दूर राहण्यासाठी हा संघ जिवाचे रान करताना दिसेल.

    मुंबई इंडियन्सने दुसऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सला दहा धावांनी धूळ चारली आणि आयपीएलच्या यंदाच्या मोसमात झोकात पुनरागमन केले. आता सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी रोहित शर्माची सेना सज्ज असेल. डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला मात्र कोलकाता नाइट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत पराभवाच्या हॅटट्रिकपासून दूर राहण्यासाठी हा संघ जिवाचे रान करताना दिसेल.

    सनरायझर्स हैदराबादमध्ये भुवनेश्वरकुमार व टी. नटराजन हे दोन अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत, पण आतापर्यंत दोघांनाही सूर गवसलेला नाहीए. यावेळी सनरायझर्स हैदराबादला फक्त फिरकीपटू राशीद खानच्या गोलंदाजीवर अवलंबून राहता येणार नाही. इतर गोलंदाजांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा सनरायझर्स हैदराबादला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागू शकते.