मुंबई आणि चेन्नईची आज होणार परीक्षा, Countdown Start

मुंबईनं युएईमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव केला होता. महेंद्रसिंह धोनीच्या टीमसाठी (MS Dhoni) मागील सिझन खराब गेला होता. त्यामुळे धोनीचं यंदा चांगल्या फॉर्ममध्ये कमबॅक झालं असून मुंबईला हरवण्यासाठी त्याची टीम तयार आहे. तसेच आता सामना सुरू होण्यासाठी काहीच तास शिल्लक राहीले आहेत. 

    दुबई :  आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन यशस्वी टीमच्या लढतीनं या स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यातील आयपीएल लढत रविवारी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

    मुंबईनं युएईमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव केला होता. महेंद्रसिंह धोनीच्या टीमसाठी (MS Dhoni) मागील सिझन खराब गेला होता. त्यामुळे धोनीचं यंदा चांगल्या फॉर्ममध्ये कमबॅक झालं असून मुंबईला हरवण्यासाठी त्याची टीम तयार आहे. तसेच आता सामना सुरू होण्यासाठी काहीच तास शिल्लक राहीले आहेत.

    आयपीएल 2021च्या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता दुबईत सुरूवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा तगडा सामना रंगणार आहे. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने ही लीग फार महत्त्वाची ठरणार असून, प्रेक्षकांच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात हातभार लागणार आहे.