रोहित शर्माची धमाकेदार फलंदाजी, मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४८ धावांनी मात

सर्वात प्रथम पंजाबने टॉस (TOSS) जिंकला. पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी भाग पाडले. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्यानंतर किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ४८ धावांनी पराभव केला.

अबुधाबी: आयपीएल २०२० (IPL 2020) च्या १३ व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kxip vs MI) यांच्यात काल गुरूवारी रात्री सामना खेळण्यात आला. यामध्ये सर्वात प्रथम पंजाबने टॉस (TOSS) जिंकला. पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी भाग पाडले. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्यानंतर किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ४८ धावांनी पराभव केला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत १९१ धावा केल्या होत्या. बदल्यात पंजाबला २० षटकात ८ बाद १४३ धावा करता आल्या. विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. पहिली विकेटसाठी कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल या दोघांनी ३८ धावा जोडल्या. मयंक अगरवालच्या रुपात पंजाबला पहिला धक्का लागला. यानंतर ठराविक अंतराने पंजाबने विकेट्स गमावले. कर्णधार रोहित शर्माने मुंबईचा डाव सावरला.

रोहितने सर्वाधिक ७० धावा केल्या. तर अखेरच्या ४ षटकात किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी केली. किरन पोलार्डने नाबाद ४७ तर हार्दिक पांड्याने नाबाद ३० धावा केल्या. पंजाबकडून शेल्डॉन कॉट्रेल, मोहम्मद शमी आणि क्रिष्णप्पा गौथमने प्रत्येकी १ विकेट घेतली.