मुंबई इंडियन्सची कोलकाता नाईट रायडर्सवर ४९ धावांनी मात

मुंबई इंडियन्सने (MI) कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) ४९ धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. आयपीएलच्या (IPL 2020) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव झाला होता. परंतु काल दुसऱ्या सामन्यात मुंबईने कोलकातावर दणदणीत विजय (win) मिळवला आहे.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians beat Kolkata Knight Riders ) यांच्यामध्ये काल बुधवारी युएईमध्ये (UAE) पाचवा सामना खेळण्यात आला. यामध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) ४९ धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. आयपीएलच्या (IPL 2020) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव झाला होता. परंतु काल दुसऱ्या सामन्यात मुंबईने कोलकातावर दणदणीत विजय (win) मिळवला आहे.

हिटमॅन रोहितने (Rohit Sharma) ६ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. रोहितनं आयपीएल कारकीर्दीत २०० षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम नाणेफेक जिंकून  फलंदाज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९५ इतक्या धावा केल्या. कोलकाता संघासमोर १९६ इतक्या धावांचं (Runs) आवाहन होतं. मात्र, कोलकाताच्या संघाला १४६ धावांपर्यंत मजल मारता आली.

कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३३ धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिक ३० आणि नितीश राणाने २४ धावा केल्या. तसेच आंद्रे रसल ११ आणि इयन मॉर्गन १६ इतक्या धावा केल्या. पॅट कमिन्सने १२ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावांची तडाखेबाज खेळी केली. परंतु फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यामुळे मुंबई संघाने ४९ धावांनी विजय मिळवला.