दिपक हुड्डामुळे मुंबई इंडियन्सचा कृणाल पांड्या ट्रेंडिंगवर, काय आहे यामागील कारण?

दिपकच्या कामगिरीमुळे कृणाल पांड्या ट्रेंडिंगला येण्याचे कारण म्हणजे या दोघांमध्ये झालेला वाद. हे दोघेही गेल्या स्थानिक क्रिकेट हंगामात बडोदा संघाकडून खेळायचे. बडोदा संघाचे नेतृत्व कृणाल पांड्या करत होता. पण, मुश्ताक अली टी - २० स्पर्धेदरम्यान कृणाल पांड्या आणि दिपक हुड्डामध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी बडोदा संघांने दिपक हुड्डाला निलंबित केले होते.

    किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज दिपक हुड्डाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध दमदार फलंदाजी करत २८ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. त्याने केएल राहुल बरोबर १०५ धावांची भागिदारी रचली. पण, दिपक हुड्डाने केलेल्या कामगिरीमुळे तो नाही तर मुंबई इंडियन्सचा कृणाल पांड्या ट्रेंडिंगवर आला.

    दिपकच्या कामगिरीमुळे कृणाल पांड्या ट्रेंडिंगला येण्याचे कारण म्हणजे या दोघांमध्ये झालेला वाद. हे दोघेही गेल्या स्थानिक क्रिकेट हंगामात बडोदा संघाकडून खेळायचे. बडोदा संघाचे नेतृत्व कृणाल पांड्या करत होता. पण, मुश्ताक अली टी – २० स्पर्धेदरम्यान कृणाल पांड्या आणि दिपक हुड्डामध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी बडोदा संघांने दिपक हुड्डाला निलंबित केले होते.

    त्यानंतर दिपक हुड्डा पहिल्यांदाच आजचा सामना खेळला आणि त्याने ६४ धावांची दमदार खेळी केली. ज्यावेळी कृणाल बरोबर वाद झाला होता त्यावेळी दिपक हुड्डाने कृणालला सरावा दरम्यान, सर्व संघासमोर अपमानजनक वागणूक देत होता. त्याने मी सराव करत असताना माझ्याशी गैरवर्तन केले त्यावेळी मी त्याला मी मुख्य प्रशिक्षकाच्या परवानगीने सराव करत आहे असे सांगितले. त्यावेळी त्याने मी संघाचा कर्णधार आहे प्रशिक्षण कोण आहेत? मीच बडोदा संघाचा सर्वेसर्वा आहे असे म्हणत मला सराव करण्यापासून रोखले आणि तू बडोदा संघाकडून कसा खेळतोच तेच पाहतो अशी दादागिरी केल्याचं कृणालने सांगितले होते.