बलाढ्य मुंबई इंडियन्सची लढत आता किंग्स इलेव्हन पंजाबसमोर, दोन्ही संघासाठी विजय खास ठरणार

आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामातील ३६ वा सामना आज रविवारी (Sunday)  मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Mumbai Indians Vs  Kings XI Punjab) यांच्यामध्ये होणार आहे. सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई (Mumbai) समोर आता पंजाबचे (Punjab) आव्हान असणार आहे.

दुबई : आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामातील ३६ वा सामना आज रविवारी (Sunday)  मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Mumbai Indians Vs  Kings XI Punjab) यांच्यामध्ये होणार आहे. सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई (Mumbai) समोर आता पंजाबचे (Punjab) आव्हान असणार आहे. तसेच हा दोन्ही संघासाठी खास ठरणार आहे. परंतु मुंबई संघाला आत्ममश्गुल राहता येणार नाही. कारण ख्रिस गेलच्या (Chris Gayle) आगमनामुळे पंजाब संघात नवा उत्साह संचारला आहे.

मुंबई संघ एका विजयामुळे प्ले-ऑफच्या समीप जाणार आहे. तर आणखी एक पराभव पंजाब संघाला या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरू शकतो. मुंबईचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सहकारी क्विंटन डिकॉक चांगल्या फॉर्मात आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट सध्या आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी गोलंदाजीची जोडी मानली जात आहे.

मात्र, दुसऱ्या बाजूचा विचार करता किंग्स इलेव्हन पंजाबचे फलंदाज धावा काढतात त्यावेळी गोलंदाज अपयशी ठरतात. परंतु वेगवान फलंदाज ख्रिस गेलची संघात वापसी झाल्यामुळे पंजाब संघाचे मनोधैर्य़ उंचावले आहेत. तसेच आज पंजाब सुद्धा विजयाच्या दिशेने उत्तम खेळी करण्याचा प्रयत्न करणार आहे. संध्याकाळी ६ वाजता हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये होणार आहे. त्यामुळे कोेणता संघ बाजी मारणार हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे.