आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज भिडणार आमनेसामने

ज्या दिवसाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर तो दिवस आज आला आहे. शनिवारपासून आयपीएल सुरूवात होणार असून सलामीच्या पहिल्या सामन्याला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (MI Vs CSK) या दोन संघांमध्ये पहिली लढत होणार आहे. त्यामुळे सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आयपीएलच्या (IPL 2020)  १३ व्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. ज्या दिवसाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर तो दिवस आज आला आहे. शनिवारपासून आयपीएलला सुरूवात होणार असून सलामीच्या पहिल्या सामन्याला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (MI Vs CSK) या दोन संघांमध्ये पहिली लढत होणार आहे. त्यामुळे सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार भारताचा वेगवान फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma)  आहे. तर चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार भारताचा माजी कॅप्टनकुल महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यात नक्की कोण विजयी ठरणार, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. मुंबई इंडियन्सने २०१९ च्या सत्रात चारही सामन्यांत विजय मिळवला. तसेच दोन साखळी सामने, एक क्वालिफायर व अंतिम सामन्याचा समावेश होता.

तसेच यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना अबुधाबी येथे रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील ५३ दिवस रंगणारे आयपीएलचे सामने पाहणे हा क्रिकेट प्रेमी आणि चाहत्यांसाठी मोठा विरंगुळा असणार आहे.