शुभमन गिलच्या जागी ‘या’ मुंबईकर खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

BCCI ने शुभमन गिलच्या रिप्लेसमेंटबाबत अधिकृत घोषणा केली नाही. मात्र सध्या दोन नावं समोर येत आहेत. त्यापैकी एक मुंबईकर तर दुसरा आयपीएल गाजवणारा खेळाडू आहे. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

    टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे.ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे शुभमन गिल जखमी झाल्याने त्याच्या जागी कोणाला संघात घेता येईल याबाबत चर्चा सुरू आहे. शुभमन गिल जखमी असल्याने आता टीम इंडियाकडून ओपनिंगची संधी के एल राहुल आणि मयंक अग्रवालला मिळू शकते अशी चर्चा आहे.

    BCCI ने शुभमन गिलच्या रिप्लेसमेंटबाबत अधिकृत घोषणा केली नाही. मात्र सध्या दोन नावं समोर येत आहेत. त्यापैकी एक मुंबईकर तर दुसरा आयपीएल गाजवणारा खेळाडू आहे. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

    मुंबईचा पृथ्वी शॉ आणि बंगळुरू संघाचा ओपनर देवदत्त पडिक्कल या दोघांच्या नावाची चर्चा आहे. मात्र पृथ्वी शॉला ही संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

    टीम इंडिया स्क्वॉड 

    विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.