श्रीलंकेच्या वरिष्ठ खेळाडूंना मुरलीधरननं फटकारलं, या मागील काय आहे नेमकं कारण?

मुरलधीरननं या विषयावर श्रीलंकेतील मीडियाशी बोलताना सांगितले की, ' त्यांना वार्षिक कराराची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. आपण आता दौऱ्यावर आधारित करारपद्धती सुरू करायला हवी.'

    भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिका 18 जुलै रोजी सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेचा दिग्गज बॉलर मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) वरिष्ठ खेळाडूंना फटकारले आहे. माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, कुसल परेरा सारखे वरिष्ठ खेळाडू टीममधील तरुण खेळाडूंवर दबाव टाकत आहेत, असा दावा त्याने केला आहे.

    मुरलधीरननं या विषयावर श्रीलंकेतील मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘ त्यांना वार्षिक कराराची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. आपण आता दौऱ्यावर आधारित करारपद्धती सुरू करायला हवी.’

    ‘वार्षिक पगारात कपात केल्यानं नाराज असलेले वरिष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंवर बोर्डाशी करार न करण्याबाबत दबाव टाकत आहेत. बोर्डानं प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी खेळाडूंनी तो स्वीकारला नाही. आता त्यांना वार्षिक कराराचा फायदा मिळणार नाही. त्यामुले टेस्ट क्रिकेटर्सचं सर्वाधिक नुकसान होणार आहे. त्यांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून मासिक वेतन मिळणार नाही. तसेच टीमला एक नोव्हेंबरपूर्वी एकही टेस्ट खेळायची नाही.’ असे मुरलीधरनने स्पष्ट केले.