neeraj chopra and nadeem

टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये( Tokyo Olympic) सुवर्णपदक मिळवलेला नीरज चोप्रा(Neeraj Chopra) याने एक व्हिडिओ (Video)ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या वक्तव्याचा गैरवापर केला गेल्याचे म्हटले आहे.

    टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये( Tokyo Olympic) सुवर्णपदक मिळवलेला नीरज चोप्रा(Neeraj Chopra) याने एक व्हिडिओ (Video)ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या वक्तव्याचा गैरवापर केला गेल्याचे म्हटले आहे. वक्तव्याचा गैरवापर करणाऱ्यांना त्याने माझ्या वक्तव्यांना तुमच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी(Neeraj Chopra Comment Used In A Wrong Way) वापरु नका असं म्हटलं आहे.

    आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, मी सगळ्यांना विनंती करतो की माझ्या वक्तव्यांचा वापर कुणीही घाणेरड्या अजेंड्याचा प्रसार करण्यासाठी करु नये. खेळ आपल्या सर्वांना एकत्र राहायला शिकवतो. कमेंट्स करण्याआधी खेळाचे नियम समजून घ्या.

    या व्हिडिओमध्ये नीरजने आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल देशवासीयांचे आभार मानले आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तो म्हणतो, “मी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की खेळाच्या वेळी भाला फेकण्यासाठी मी पाकिस्तानी खेळाडू नदीमकडून भाला घेतला. पण त्याला मोठा मुद्दा बनवण्यात आलं. ही खूप साधी गोष्ट आहे. आपल्या व्यक्तिगत भाल्याचा वापर सर्व खेळाडू करु शकतात. तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात काही मोठी गोष्ट नाही. तो भाला घेऊन नदीम तयारी करत होता आणि माझ्या खेळावेळी मी त्याला तो भाला मागितला. यात वेगळं काहीच नाही. पण काही लोक हा खूप मोठा मुद्दा बनवत आहे. त्या सर्वांना माझी विनंती आहे की असं काही करु नका.”

    नीरजने एका मुलाखतीत सांगितले होते की ”मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. मला तो मिळत नव्हता. अचानक मला अर्शद नदीम माझा भाला घेऊन चालताना दिसला. मी माझा भाला परत मागितला. मग त्याने तो मला परत दिला. तेव्हाच तुमच्या लक्षात आले असेल की मी माझा पहिला थ्रो घाईत केला.”