धोनीच्या घरी नवा पाहुणा; पत्नी साक्षीने शेअर केला खास फोटो

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या लग्नाचा रविवारी 11 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने महेंद्रसिंह धोनीने पत्नी साक्षीला एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिली आहे. साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली.

    दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या लग्नाचा रविवारी 11 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने महेंद्रसिंह धोनीने पत्नी साक्षीला एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिली आहे. साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली.

    तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरही कारचा फोटो ठेवला होता. धोनीला थँक्यू म्हणत साक्षीने ही पोस्ट केली होती. ही कार जुन्या काळातील असल्यामुळे नेमकी कंपनी आणि मॉडेल अजून स्पष्ट झालेले नाही.