चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात नवा ‘मलिंगा’; अनेकांची उडवली झोप, पाहा कोण आहे हा खेळाडू?

चेन्नई सुपर किंग्सच्या वरिष्ठ खेळाडूंसह दोन युवा गोलंदाजही सरावाला लागले आहेत. महिश थिक्शाना आणि मथिशा पथिराणा या श्रीलंकन गोलंदाजांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

  चेन्नई सुपर किंग्स संघानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या तयारीला सुरूवात केली आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स त्यांचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर खेळणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

  महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड आणि अन्य काही खेळाडू आधीच चेन्नईला सरावसत्रासाठी दाखल झाले आहेत. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये त्यांना तळाच्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं आणि यंदा ती कामगिरी सुधारून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी ते सज्ज होत आहेत.

  चेन्नई सुपर किंग्सच्या वरिष्ठ खेळाडूंसह दोन युवा गोलंदाजही सरावाला लागले आहेत. महिश थिक्शाना आणि मथिशा पथिराणा या श्रीलंकन गोलंदाजांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

  दोन्ही अनकॅप खेळाडू CSKच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत आणि पथिराणा यानं सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्याची गोलंदाजीची शैली ही लसिथ मलिंगाच्या शैलीशी तंतोतंत मिळतीजुळती आहे. या गोलंदाजानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या यशस्वी जैस्वालला १७५Kphच्या वेगानं चेंडू टाकून आश्चर्यचकित केलं होतं.