न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार जॉन रीड यांचे निधन

न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार (New Zealand cricketer and former captain ) जॉन रीड (John Reid ) यांचे काल बुधवारी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ९२ वर्षांचे होते. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून (New Zealand Cricket Board ) ही माहिती देण्यात आली. परंतु जॉन रीड यांच्या निधनाचे कारण क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलेले नाही.

जॉन रीड यांनी १९४९ साली १९ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ५८ कसोटींमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. ३४ कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले. न्यूझीलंड संघाने जिंकलेल्या पहिल्या तीन कसोटींत त्यांनीच कर्णधारपद भूषवले हे विशेष आहे.

जॉन रीड यांचा जन्म ऑकलंडमध्ये झाला. तसेच वेलिंग्टन येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. १९६५ साली ते निवृत्त झाले. यानंतर न्यूझीलंडचे निवड समिती सदस्य, व्यवस्थापक व आयसीसीचे सामनाधिकारी म्हणूनही त्यांनी भूमिका चोख बजावली.