न्यूझीलंड संघाचा पाकिस्तान दौरा रद्द, इम्रान खानचा न्यूझीलंडच्या PM ला फोन

१८ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने पहिला सामना खेळण्यापूर्वीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातल्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार होती. पण, दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आलेच नाही. न्यूझीलंड सरकारनं सुरक्षेबाबत अलर्ट दिल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

    पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला न्यूझीलंडच्या संघाने मोठा धक्का दिला आहे. १८ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने पहिला सामना खेळण्यापूर्वीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातल्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार होती. पण, दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आलेच नाही. न्यूझीलंड सरकारनं सुरक्षेबाबत अलर्ट दिल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

    आम्हाला सुरक्षेबाबत अलर्ट देण्यात आला आणि त्यानंतर हा दौरा कायम राखणे आम्हाला शक्य नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा मोठा धक्का आहे, याची आम्हाला जाण आहे. पण, खेळाडूंची सुरक्षा हे आमचे प्राधान्यक्रम आहे आणि दौरा तुर्तास रद्द करणे हेच योग्य आहे. असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेव्हीड व्हाईट यांनी सांगितले आहे.

    इम्रान खानचा न्यूझीलंडच्या PM ला फोन

    न्यूझीलंडच्या राष्ट्रध्यक्षांशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः फोनवरून चर्चा केली. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम intelligence systems असल्याचे सांगून न्यूझीलंड संघाला कोणताच धोका नसल्याचे ते म्हणाले.