Nissan Magnite आहे आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२१ ची अधिकृत कार

ख्यातनाम क्रिकेट लिजंड कपिल देव (Kapil Dev) यांच्यासोबत भागीदारी करून निस्सान इंडियाने नेहमीच नाविन्यता आणि नाविन्यपूर्ण संवादावर भर दिला आहे. कपिल देव यांनी निस्सानसोबत कोविड-१९ विरोधात भारताला सक्षम आणि शिक्षित करण्यासाठी जनसामान्यांसाठी एकात्मिक जनजागृती आणि सुरक्षा मोहिमेचाही शुभारंभ केला.

  • निस्सान आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२१ चे अधिकृत प्रायोजक
  • निस्सान मॅग्नाईट ही आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२१ ची अधिकृत कार
  • निस्सान इंडिया आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप व्हजर्च्युअल ट्रॉफी टूर प्रमोट करणार

नवी दिल्ली : निस्सान आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपची (Nissan ICC Mens T20 World Cup 2021) अधिकृत प्रायोजक आणि निस्सान मॅग्नाईट (Nissan Magnite) आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२१ची अधिकृत कार (Official Car) आहे. ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये (UAE And Oman) १७ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान खेळली जाणार आहे.

“आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप या स्पर्धेची भारत वाट पाहत असताना निस्सान इंडियाला अभिमान वाटतो की, ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ म्हणजे जगासाठी भारतात बनलेली एसयुव्ही, बिग बोल्ड ब्युटिफुल निस्सान मॅग्नाईट ही आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपची अधिकृत कार आहे. या आव्हानात्मक काळात आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप सर्वांमध्ये महत्त्वाकांक्षा, उत्साह जागवेल आणि सर्वांचे मनोरंजन करेल, अशी आम्ही आशा करतो,” असे निस्सान मोटर इंडियाचे अध्यक्ष सिनान ओझकोक म्हणाले.

ख्यातनाम क्रिकेट लिजंड कपिल देव (Kapil Dev) यांच्यासोबत भागीदारी करून निस्सान इंडियाने नेहमीच नाविन्यता आणि नाविन्यपूर्ण संवादावर भर दिला आहे. कपिल देव यांनी निस्सानसोबत कोविड-१९ विरोधात भारताला सक्षम आणि शिक्षित करण्यासाठी जनसामान्यांसाठी एकात्मिक जनजागृती आणि सुरक्षा मोहिमेचाही शुभारंभ केला. Instagram AR filter च्या माध्यामातून आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपच्या व्हर्च्युअल ट्रॉफी टूरला प्रमोट करण्यासाठी कपिल देव यांनी निस्सान इंडियाला सहकार्य केले आहे. प्रत्येक जण हे क्लिक करून शेअर करू शकेल.

“२०१६ पासून निस्सान आयसीसी ग्लोबल इव्हेंट्सची अधिकृत प्रायोजक आहे आणि आता आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप प्रायोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. आशेचा किरण आणि आनंद देत लोकांना एकत्र आणून त्यांची मने जिंकणारी ही स्पर्धा आहे,” असे निस्सान मोटर इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले.

नुकत्याच सादर झालेल्या नव्या निस्सान मॅग्नाईटला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. फक्त ३० पैसे/किमी. (५०००० किमी. साठी) इतका कमी आणि आजवरचा सर्वोत्कृष्ट देखभालीचा दर या गाडीला असल्याने ६०००० अधिक बुकिंग्स झाल्या. शिवाय यात २ वर्षांची वॉरंटी (५०००० किमी.) आहे आणि ती अगदी नाममात्र दरात ५ वर्षांपर्यंत (१००००० किमी.) वाढवता येते. त्यामुळे ग्राहकांना मन:शांतीही लाभते. निस्सान ग्राहकांना Nissan Service Hub किंवा Nissan Connectच्या माध्यमातून सर्विस बुक करता येते शिवाय निस्सान सर्विस कॉस्ट कॅलक्युलेटरच्या माध्यमातून ऑनलाइनच खर्चही जाणून घेता येतो. त्यामुळे १५०० हून अधिक* शहरांमध्ये उपलब्ध निस्सानच्या २४/७ रोडसाइड असिस्टंसच्या प्रक्रियेत पारदर्शकता जपली जाते.

त्याचप्रमाणे, निस्सानच्या Shop@Home मुळे ग्राहकांना देशात विक्रीसाठी उपलब्ध कोणतीही निस्सान गाडी व्हर्च्युअल शोरूममध्ये अनुभवता येते आणि व्हर्च्युअली टेस्ट ड्राइव्ह घेता येते. त्याचप्रमाणे कार बुक करण्याआधी कार पर्सनलाइज करणे, सध्याच्या गाडीची एक्सचेंज किंमत तपासणे, त्याची मोजदाद करणे, ईएमआयची तुलना करून पाहणे आणि कर्जासाठी अर्ज करणे अशा विविध सेवा पुरवल्या जातात. निस्सान ब्रँड सीएसडी कँटिनमध्येही उपलब्ध आहेत.