भारतातून ऑस्ट्रेलियात येण्यास बंदी, आता…ऑस्ट्रेलियाचे खेळाडू घरी कसे परतणार?

ऑस्ट्रेलियाने कोणत्याही देशाच्या मार्गे भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. मायदेशी परतणाऱ्या स्थानिकांवर बंदी घालून त्यांना अपराधी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतासंदर्भात ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या निर्णयावर भारतीय माणसं, मानवाधिकार संघटना यांनी विरोध केला आहे.

    भारतातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. यामध्ये राजस्थानकडून खेळणारा अँड्र्यू टाय आणि बेंगळुरू संघाचे केन रिचर्डसन आणि अॅडम झंपा यांचा समावेश होता. हे तिघे मेलबर्नला पोहोचल्यानंतर नवे नियम लागू झाले. त्यामुळे त्यांना परतता आलं. हे तिघे कतारमार्गे ऑस्ट्रेलियाला पोहोचले होते.

    ऑस्ट्रेलियाने कोणत्याही देशाच्या मार्गे भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. मायदेशी परतणाऱ्या स्थानिकांवर बंदी घालून त्यांना अपराधी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतासंदर्भात ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या निर्णयावर भारतीय माणसं, मानवाधिकार संघटना यांनी विरोध केला आहे.

    चार्टर्ड फ्लाईटचा पर्याय

    तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी आमची, असं बीसीसीआयने म्हटलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं सरकार, इथला राजदूत बीसीसीआय, केंद्र सरकार यांच्यात समन्वय होण्याची शक्यता आहे.