नोवाक जोकोविच कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर

जोकोविचनं यापूर्वी २०१९ साली अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०२० साली त्याचा चौथ्या फेरीत पराभव झाला होता

    अमेरिकन ओपन टेनिस (US Open 2021) स्पर्धा सुरु असून जगातील नंबर वन टेनिस खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जोकविचनं सेमी फायनलमध्ये जर्मनीच्या अ‍ॅलेक्झँडर ज्वेरेवचा (Alexander Zverev) ४-६,६-२,६-२,४-६ आणि ६-२ असा पाच सेटमध्ये पराभव केला. जोकविचचा ग्रँड स्लॅम स्पर्धेतील हा सलग 27 वा विजय आहे. या विजयानंतर आता तो कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.

    जोकविचनं या वर्षी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बलडन या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. ११६९साली ऑस्ट्रेलियाच्या रॉड लेवर यांनी एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम जिंकल्या होत्या. त्यानंतर हा पराक्रम करणारा पहिला पुरुष टेनिसपटू होण्याची संधी त्याला आहे. या वर्षी झालेल्या टोकोयो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅलेक्झँडर ज्वेरेवनं जोकोविचचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला त्यानं या मॅचमध्ये घेतला आहे.

    जोकोविचनं यापूर्वी २०१९ साली अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०२० साली त्याचा चौथ्या फेरीत पराभव झाला होता. तर मागील वर्षी चौथ्या फेरीतच जोकविचचा फटका शॉट लाईनवर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला लागला होता. त्यामुळे त्याला बाद घोषित करण्यात आले होते.