नोवाक जोकोविचची विजयी सुरुवात; सँडग्रेनवर सरळ सेटमध्ये मात, सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश

फ्रांसमध्ये रात्री ९ वाजेनंतर असलेल्या कर्फ्यूमुळे या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी नव्हती. परंतु, प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवायही जोकोविचने उत्कृष्ट खेळ करत सरळ सेटमध्ये हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

    सर्बियाच्या नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजयी सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोविचने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या टेन्यस सँडग्रेनवर ६-२, ६-४, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. रात्रीच्या सत्रात झालेला हा पुरुष एकेरीतील पहिलाच सामना ठरला.

    फ्रांसमध्ये रात्री ९ वाजेनंतर असलेल्या कर्फ्यूमुळे या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी नव्हती. परंतु, प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवायही जोकोविचने उत्कृष्ट खेळ करत सरळ सेटमध्ये हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

    जोकोविचला मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात राफेल नदालने पराभूत केले होते. त्यामुळे यंदा दमदार पुनरागमन करत १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्यास जोकोविच उत्सुक आहे.