ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूला Dominos लाईफटाईम फ्री पिझ्झा पुरवणार

या मोठ्या विजयानंतर मीराबाई चानूने मुलाखतीत पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची इच्छा ऐकून डॉमिनोजने (Dominos Pizza) तिला लाइफटाईम फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे.

    भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू ने टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात हे पदक जिंकले. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण २०२ किलो वजन उचलून हे पदक जिंकले. या मोठ्या विजयानंतर मीराबाई चानूने मुलाखतीत पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची इच्छा ऐकून डॉमिनोजने (Dominos Pizza) तिला लाइफटाईम फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे.


    डॉमिनोजने ट्वीट केले आहे, “मीराबाई चानूने म्हटलं आणि आम्ही ते ऐकलं. मीराबाई चानूने पिझ्झा खाण्याची वाट पाहू नये अशी आमची इच्छा नाही. म्हणूनच आम्ही तिला आजीवन मोफत डॉमिनोज पिझ्झा देत आहोत.” हॅशटॅग पिझ्झा फॉर लाईफ असेही कंपनीने म्हटले आहे. डॉमिनोज कंपनीने तत्परतेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी सोशल मीडियावरील लोक डॉमिनोजचे आभार मानत आहेत.

    मीराबाई चानूनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलंय की, “काल मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझं पहिलं पदक देशवासियांना समर्पित करतेय”