Only one run won the match; Bangalore's thrilling victory over Delhi

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेतील २२ वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Delhi Capitals vs Royal Challengers Banglore)अशी लढत झाली. या थरारक सामन्यात विराटसेनेचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला.

    अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेतील २२ वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Delhi Capitals vs Royal Challengers Banglore)अशी लढत झाली. या थरारक सामन्यात विराटसेनेचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला.

    नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरु कडून ए बी डीविलीयर्सने ४२ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार खेळी केली.या धावांच्या मदतीने बंगळुरूने निर्धारित २० ओव्हर्समध्ये १७१ धावा काढल्या.

    १७२ धावांच लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीकडून शिमरोन हेटमायरने २३ चेंडूत ५३ धावांची तुफानी नाबाद खेळी केली.तर रिषभ पंतने ४८ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली.

    बंगळुरूच्या हर्षल पटेलने २ विकेट्स तर जेमिसन आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली. सिराजच्या चांगल्या अंतिम ओव्हरमुळे बंगळुरूने दिल्लीवर एका धावेने मात केली. ए बी डिविलीयर्स हा सामनावीर ठरला.