टीम इंडिया सामन्यासाठी सज्ज, सलामीवीर जोडी रोहित शर्मा-शिखर धवन मैदानात

टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरूवात झाली असून सलामीवीर जोडी हिटमॅन रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात उतरले आहेत. पहिली ओपनिंग हे दोघे करणार आहेत.

    पुणे : टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरूवात झाली असून सलामीवीर जोडी हिटमॅन रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात उतरले आहेत. पहिली ओपनिंग हे दोघे करणार आहेत. हा पहिला एकदिवसीय सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. तसेच आज हा सामना टीम इंडिया खिशात घालणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया सुरूवातीलाच फलंदाजी करणार आहे. परंतु ओपनिंगला पहिली संधी कोणाला मिळणार ? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. पण आता दोन्ही सलामीवीर जोड्या मैदानात उतरल्या असून तुफानी खेळी सुरू आहे.

    असा आहे उभय संघ :

    टीम इंडिय़ा : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा

    इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग, मोइन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल राशिद, मार्क वूड