पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ‘या’ खेळाडूला संधी का दिली नाही? माजी क्रिकेटपटू अजित आगरकरांनी उपस्थित केला प्रश्नचिन्ह

भारताने तिसरी वनडे (ODI) जिंकल्यानंतर विराट टी-२० (T-20) साठी टीममध्ये फार बदल करणार नाही, अशी अपेक्षा होती, पण त्याने तब्बल ५ खेळाडू बदलले. यावर अजित आगरकरांनी (Ajit Agarkar) प्रतिक्रिया दिली आहे.

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) संघात पहिला टी-२० सामना (T-20) कॅनबेराच्या मनुका ओव्हलमध्ये सुरू आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) हा एका सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला असला तरी, त्याच्या कर्णधारपदावर कायमच प्रश्न उपस्थित केले जाताहेत. पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने संघात बदल केले आहेत. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकरांनी (Ajit Agarkar) प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

भारताने तिसरी वनडे (ODI) जिंकल्यानंतर विराट टी-२० साठी टीममध्ये फार बदल करणार नाही, अशी अपेक्षा होती, पण त्याने तब्बल ५ खेळाडू बदलले. यावर अजित आगरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताने ६ बॅट्समन घेऊन खेळण्याचा निर्णय योग्य आहे, पण युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) टीममध्ये न बघून हैराण झाल्याचं आगरकर म्हणाले. चहल का बाहेर आहे, ते मला माहिती नाही. तो अनफिट आहे का फॉर्ममध्ये नाही, म्हणून त्याला बाहेर केलं? कारण काहीही असो, चहल टीममध्ये नसणं आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया आगरकर यांनी दिली.

कोहलीने या मॅचसाठी टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, मनीष पांडे, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी यांना संधी दिली आहे. तर सुंदर, मनिष आणि सॅमसन या दौऱ्यातली पहिलीच मॅच खेळत आहेत, तर नटराजन आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.