सलग दोन ऑलिम्पिक पदकं मिळवणारी ती पहिली महिला, पी.व्ही. सिंधूच्या वडिलांनी व्यक्त केला आनंद

मी तिला खूप प्रेरणा दिली. मी तिला म्हणालो की, विचार कर की तु मला एक भेट देत आहेस आणि कोर्टवर खेळ.  संपूर्ण राष्ट्राच्या आशीर्वादाने तिने पदक मिळवले आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारी ती पहिली महिला आहे याचा मला आनंद आहे. असं पी. व्ही. सिंधूचे वडील पी.व्ही. रमण्णा म्हणाले.

    भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्य पदक मिळवले आहे. दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे.  कांस्यपदकासाठीच्या लढतीत सिंधूने ५२ मिनिटाच चीनच्या हे बिंग जिआओवर २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली होती.

    पी.व्ही. सिंधूच्या वडिलांनी व्यक्त केला आनंद

    मी तिला खूप प्रेरणा दिली. मी तिला म्हणालो की, विचार कर की तु मला एक भेट देत आहेस आणि कोर्टवर खेळ. संपूर्ण राष्ट्राच्या आशीर्वादाने तिने पदक मिळवले आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारी ती पहिली महिला आहे याचा मला आनंद आहे. असं पी. व्ही. सिंधूचे वडील पी.व्ही. रमण्णा म्हणाले.

    पुढे म्हणाले की, मी पार्क (सिंधूचे प्रशिक्षक) यांचे आभार मानतो की, त्यांनी खूप मेहनत घेतली. त्याशिवाय, GOI, BAI, OGQ, समर्थक आणि प्रायोजक. प्रत्येकाने तिला सर्व प्रोत्साहन दिले आहे. असे पी.व्ही. रमण्णा म्हणाले.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांनी ठेवलेल्या अपेक्षाला साजेसा खेळ करत पी.व्ही. सिंधूने पदकाची कमाई केली आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिंधूने ब्राँझ पदकाच्या सामन्यात चीनच्या हे बिंग जिआओवर सरळ दोन सेटमध्ये मात करत सामना जिंकला.