पाकिस्तानचा द्रुतगती गोलंदाज शोएब अख्तरने दिले आव्हान, म्हणाला…

फहाद मुस्तफाने आतापर्यंत शोएबच्या या आव्हानावर उत्तर दिलेले नाही. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक सय्यद जुल्फिकार बुखारी यांनी या वादात उडी घेतली आहे. बुखारी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ते शोएबचे आव्हान स्वीकारण्यास तयार आहेत.

    इस्लामाबाद :  पाकिस्तानचा द्रुतगती गोलंदाज शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र आक्रमक वक्तव्ये आणि वादविवाद यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आता ट्विटरवरून दिलेल्या आव्हानामुळे शोएब अख्तर चर्चेत आला आहे. शोएबने दिलेल्या या आव्हानाची पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

    काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याला आव्हान दिले होते. मुस्तफाने माझ्या गोलंदाजीवर सहा चेंडू खेळून दाखवावेत. तसे केल्यास मी त्याला एक मोटारसायकल बक्षीस म्हणून देईन.