‘या’ पाकिस्तानी गोलंदाजाला वाटते रोहित शर्माच्या शॉट्सची भीती, म्हणाला….

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा  गोलंदाज हसन अलीने (Hasan Ali) नुकत्याच एका मुलाखतीत रोहितचं (Rohit Sharma) कौतुक करत त्याला बॉलिंग करताना भीती वाटते असे स्पष्ट केले आहे.

    भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेकांचा आवडता खेळाडू आहे. काहीजण त्याच्या बॅटींगचे फॅन आहेत तर काहीजण बॉलिंगचे फॅन आहेत.  पाकिस्तानी क्रिकेट संघाचा  गोलंदाज हसन अलीने (Hasan Ali) नुकत्याच एका मुलाखतीत रोहितचं कौतुक करत त्याला बॉलिंग करताना भीती वाटते असे स्पष्ट केले आहे.

    हसनला एका मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. कोणता असा फलंदाज आहे जो तुला चुरशीची टक्कर देऊ शकतो? यावर उत्तर देताना हसन म्हणाला, “ जो फलंदाज माझ्यासाठी चिंतेच कारण आहे तो म्हणजे रोहित शर्मा. मला सर्वात आधी आशिया कपमध्ये आणि नंतर वर्ल्‍ड कपमध्ये ही गोष्ट जाणवली. रोहित मैदानात कोणत्याही दिशेला शॉट खेळू शकतो. त्याच्यासारखे शॉट इतर कोणताच फलंदाज खेळू शकत नाही.”

    हसन अली पुढे म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी रोहित शर्माला बोलिंग करण्याची संधी मला मिळाली नाही. असं झालं असत तर रोहितने मला बरेच रन ठोकले असते.”

    रोहितने हसन अली विरोधात ८७ चेंडूत ९५ रन केले असून त्याचा स्ट्राइक रेट १०९ चा राहिला आहे. संपूर्ण पाकिस्तान संघाविरोधात रोहितचा रेकॉर्ड धडाकेबाज असून मागील दोन महत्त्वाच्या सामन्यात रोहितने पाकिस्तान विरोधात शतक ठोकले आहेत. आधी २०१८ मध्ये आशिया कप आणि नंतर २०१९ च्या विश्वचषकात रोहितने  शतक ठोकले आहे.