बीसीसीआयकडून अंतिम सामन्यात बदल होण्याची शक्यता

 बीसीसीआय यावर्षीच्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल करण्याची तयारी करत आहे. यात प्लेऑफ व अंतिम सामना एकाच मैदानावर खेळवला जाणार असल्याची शक्यता आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी दुबईला पसंती दिली जात आहे.इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 मध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. यावर्षी एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत

    इंडियन प्रीमियर लीगच्या सीझन 14 चा दुसरा टप्पा युएईमध्ये खेळला जाणार आहे. आयपीएल 14 पुन्हा 17 सप्टेंबरपासून सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप या स्पर्धेच्या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नाही. बीसीसीआय जून अखेर आयपीएल 14 च्या दुसर्‍या भागाचे वेळापत्रक जाहीर करू शकते.