भारताने पटकावलं चौथं सुवर्णपदक, बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतची सुवर्ण कामगिरी

बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतने (Pramod Bhagat) भारतासाठी सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे. भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगतने एसएल-३ च्या अंतिम सामन्यात ब्रिटेनच्या डेनियल बेथेलला २१-१४, २१-१७ ने हरवलं आहे. तर प्रमोद नंतर मनोजने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

    टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय बॅडमिंटनपटूंची सुवर्ण कामगिरी सुरु आहे. बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतने (Pramod Bhagat) भारतासाठी सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे. भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगतने एसएल-३ च्या अंतिम सामन्यात ब्रिटेनच्या डेनियल बेथेलला २१-१४, २१-१७ ने हरवलं आहे. तर प्रमोद नंतर मनोजने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

    सेमीफायनलमध्ये प्रमोद भगतने साजेशी कामगिरी केेली होती. पहिल्या दोन डावात अडखळत सुरुवात झाली होती. पण त्यानंतर प्रमोद भगतने संपूर्ण सामन्यावर अखेरपर्यंत पकड कायम ठेवली आणि फायनलमध्ये समावेश केला. अंतिम सामन्यात दाखल होताच भारताच्या खात्यात १४ वे मेडल निश्चित झाले आहे.