प्रवीण कुमारने उंच उडीमध्ये पटकावले ‘Silver Medal’

भारतीय पॅरा खेळाडूंनी आतापर्यंत टोकियोमध्ये २ सुवर्णांसह १० पदके जिंकली आहेत. अवनी लाखेराने महिला SH1-10मीटर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय सुमित अँटिलने उंच उडीत सुवर्णपदक पटकावले.

  टोकियो: जपानमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये(TokyoParalympics-2020) प्रवीण कुमारने पुरुषांच्या टी -64 उंच उडीमध्ये रौप्य पदक(Silver Medal) पटकावले आहे. टोकियो(Tokyo)मधील भारताचे हे ११ वे पदक आहे.

  यापूर्वी प्रवीणने जुलै२०१९ मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही रौप्य पदक जिंकले होते. त्याने जागतिक ग्रां प्रीमध्ये सुर्वणपदक मिळवले होते. तसेच त्याने उंच उडीमध्ये २.०५मीटरसाचे आशियायी रेकॉर्ड बनवले होते.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केले ‘अभिनंदन’

  पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारने रौप्य पदक जिंकल्याचा देशाला अभिमान आहे. हे पदक त्याच्या मेहनतीचे आणि अतुलनीय समर्पणाचे फळ असून, त्याचे खूप अभिनंदन. त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी

  तिरंदाजीमध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपन एलिमिनेशन १/१६ मध्ये पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

  त्याचबरोबर प्राची यादव कॅनो स्प्रिंटमध्ये अंतिम फेरीत पोहोचली आहे.त्याचबरोबर सुहास एल.एथिराजने बॅडमिंटनमधील पुरुष एकेरी SL-4 सामन्यातही पुढील फेरी गाठली आहे.

  दुसरीकडे प्राचीने कॅनो स्प्रिंटच्या महिला एकेरीत २०० मीटर व्हीएल -२ स्पर्धेत तिसरा स्थानावर राहत अंतिम फेरीत स्थान मिळवले.तिने हे अंतर १:०७:३९७ ने पूर्ण केले. प्राची यादव ग्वाल्हेरमधील बहोदापूर परिसरातील आनंद नगरची रहिवासी आहे. कॅनोइंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला खेळाडू आहे

  भारताला २ सुवर्णांसह १० पदके
  भारतीय पॅरा खेळाडूंनी आतापर्यंत टोकियोमध्ये २ सुवर्णांसह १० पदके जिंकली आहेत. अवनी लाखेराने महिला SH1-10मीटर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय सुमित अँटिलने उंच उडीत सुवर्णपदक पटकावले. दुसरीकडे, जाविलनमध्ये F46 मध्ये देवेंद्र झाझरिया, डिस्कसच्या F56 मध्ये योगेश कठुनिया, टेबल टेनिसच्या वर्ग -4 मध्ये भाविनाबेन पटेल, T47 च्या उंच उडीमध्ये निषाद, T-42 च्या उंच उडीमध्ये मरिअप्पन थंगावेलूने रौप्य पदक जिंकले आहे.तर T42 च्या उंच उडीत शरदकुमार आणि F46 च्या भालाफेकमध्ये सुंदर गुर्जर आणि सिंहराज अधाना यांनी- 10मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत.