पाकिस्तानातून भारतासाठी प्रार्थना ; शोएब मलिकची अल्लाहकडे दुवा म्हणतो…

भारताचा शेजारी पाकिस्तानमधून भारतीय बांधवांसाठी दुवा- प्रार्थना सुरु आहे. पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याने आपल्या भावना भारतीयांप्रती व्यक्त करत अल्लाहकडे दुवा मागितली आहे. 

    नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या कठीण प्रसंगी भारताचा शेजारी पाकिस्तानमधून भारतीय बांधवांसाठी दुवा- प्रार्थना सुरु आहे. पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याने आपल्या भावना भारतीयांप्रती व्यक्त करत अल्लाहकडे दुवा मागितली आहे.

    शोएब मलिकची अल्लाहकडे दुवा

    भारतीयांसाठी सध्या कठीण दिवस आहेत. प्रत्येक जण कोरोनाच्या या अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण पाकिस्तानच्या भावना भारतीयांसोबत आहे. मी अल्लाहकडे दुवा मागतो की, भारतीयांना लढण्यासाठी अल्लाहने शक्ती द्यावी. भारतीयांना कोरोनाला हरविण्यासाठी आता हिम्मत ठेवावी लागेल. मला आशा आहे की भारतीय बांधव लवकरच कोरोनावर मात करतील’, अशा भावना शोएब मलिकने व्यक्त केल्या आहेत.