पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोनीला लिहिलं खास पत्र

नरेंद्र मोदींनी पत्रात म्हटलं आहे की, १५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये म्हणजेच अनपेक्षितपणे एक लहान व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरुन देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत. असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत १५ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिलं आहे. धोनीनेच ट्विटवरुन हे पत्र शेअऱ केलं आहे. 

नरेंद्र मोदींनी पत्रात म्हटलं आहे की, १५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये म्हणजेच अनपेक्षितपणे एक लहान व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरुन देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत. असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

तुझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीकडे आकडेवारीच्या नजरेने पाहता येईल. कारण सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये तूझा समावेश आहे. संपूर्ण जगभरात भारताला तू अव्वल स्थानावर नेण्यास मोलाचे योगदान दिले आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझे नावं, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार आणि सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये नक्कीच घेतले जाईल. तसेच कठीण परिस्थितीमध्ये आत्मनिर्भर कसे असावे, हे तू दाखवून दिले. त्याचबरोबर एखादा सामना संपवण्याची तुझी शैली खास आहे. २०११ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेली अविस्मरणीय खेळी. धोनी, तुला फक्त आकडेवारीमध्ये आम्ही लक्षात ठेवू शकत नाही, तर एकहाती सामना जिंकवण्यासाठी तू आमच्या मनात राहशील.

महेंद्रसिंह धोनी हे नाव केवळ सामना जिंकण्याच्या शैलीसाठी लक्षात राहणार नाही. तर तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे चुकीचं ठरेल. तुझे योगदान हे आश्चर्यचकित करणारे आहे असं म्हणता येईल. एका लहानश्या शहरामधून तुझ्या करिअरची सुरुवात झाली आणि तू राष्ट्रीय पातळीवर आला. त्यानंतर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि महत्वाचं म्हणजे भारताला अभिमान वाटेल अशी उत्तम कामगिरी केलीस. तुझी प्रगती आणि कामगिरी ही करोडो भारतीय तरुणांना प्रेरणा देणारी आहे.