पृथ्वी शॉनं चेंडू डायरेक्ट हिट केला, पण चेंडू हिटमॅनच्या हातावर आदळला, अन्…व्हिडिओ व्हायरल

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं ३५ व्या ओव्हरचे पहिले पाच बॉल टाकल्यानंतर त्याच्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तोही सामन्यातून बाहेर गेला आहे. नवदीप सैनी याच्या बदल्यात पृथ्वी शॉला घेण्यात आलं आहे. परंतु मैदानावर आलेल्या पृथ्वी शॉने डायरेक्ट हिट केलेला चेंडू हिटमॅन रोहित शर्माच्या उजव्या हातावर लागल्याने धाकधुक वाढली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथी आणि शेवटची कसोटी सुरू आहे. यामध्ये टीम इंडियच्या एकूण नऊ खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे त्यांना सामने मुकावे लागले आहेत. त्यातही वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं ३५ व्या ओव्हरचे पहिले पाच बॉल टाकल्यानंतर त्याच्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तोही सामन्यातून बाहेर गेला आहे. नवदीप सैनी याच्या बदल्यात पृथ्वी शॉला घेण्यात आलं आहे. परंतु मैदानावर आलेल्या पृथ्वी शॉने डायरेक्ट हिट केलेला चेंडू हिटमॅन रोहित शर्माच्या उजव्या हातावर लागल्याने धाकधुक वाढली आहे.

आजच्या सामन्यात टीम इंडियाकडून टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांनी पदार्पण केलं. दोन कसोटीचा अनुभव असलेल्या सिराजनं पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉर्नरला बाद केलं. ९व्या षटकात अजिंक्यनं शार्दूल ठाकूरच्या हाती चेंडू दिला आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर मार्कस हॅरीसला माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन ही सेट जोडी वॉशिंग्टन सुंदरनं तोडली. स्मिथ व लाबुशेन ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. या जोडीनं १५६ षटकं खेळून काढताना ७० धावांची भागीदारी केली.