Pune: Ruturaj Gaikwad grand welcome

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा शिलेदार ऋतूराज गायकवाड याचे रविवारी सकाळी जुनी सांगवीतील घरी आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व शुभेच्छांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले(Pune: Ruturaj Gaikwad grand welcome).

    पुणे : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा शिलेदार ऋतूराज गायकवाड याचे रविवारी सकाळी जुनी सांगवीतील घरी आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व शुभेच्छांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले(Pune: Ruturaj Gaikwad grand welcome).

    परिसरातील नागरिकांनी ऋतुराजाच्या घराबाहेर आकर्षक फुग्यांची सजावटही केली होती. ऋतुराज घराबाहेर येताच भारतीय संस्कृतीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याचे औक्षणही केले.

    आयपीएलमध्ये ऋतूराज गायकवाड याच्या कामगिरी बद्दल शहरवासीयांनी फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला होता. जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत राहणा-या ऋतुराज ने आपल्या शैलीदार फलंदाजीने क्रिकेट वर्तुळात स्वताचा ठसा उमटवला. जुलै महिन्यात ऋतुराजने वन डे व टी 20 सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यात त्याची निवड झाली होती.