आरसीबीचा विजयरथ रोखणे पंजाब किंग्स ठरणार आव्हान; सामना कधी, कुठे, केव्हा?

कोलकाता नाइट रायडर्सकडून पाच गडी राखून पराभूत झालेल्या पंजाबसाठी बेंगळूरुसारख्या आव्हानात्मक संघाशी सामना करणे सोपे नसेल. बेंगळूरुने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर एक धावेने निसटता विजय मिळवला होता. आतापर्यंतच्या सहा सामन्यांत पंजाबच्या फलंदाजातील सातत्याचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे.

    आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट हंगामात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा विजयरथ रोखणे शुक्रवारी पंजाब किंग्जला आव्हान ठरणार आहे.  बेंगळूरुने सहा सामन्यांपैकी पाच विजयांसह १० गुण मिळवले आहेत, तर पंजाब दोन विजय आणि चार पराभवांमुळे सहाव्या क्रमांकावर आहे.

    कोलकाता नाइट रायडर्सकडून पाच गडी राखून पराभूत झालेल्या पंजाबसाठी बेंगळूरुसारख्या आव्हानात्मक संघाशी सामना करणे सोपे नसेल. बेंगळूरुने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर एक धावेने निसटता विजय मिळवला होता. आतापर्यंतच्या सहा सामन्यांत पंजाबच्या फलंदाजातील सातत्याचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे.

    के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या खात्यावर प्रथम फलंदाजी करताना १०६, १२० आणि १२३ अशा यंदाच्या हंगामातील नीचांकी धावसंख्यांची नोंद झाली आहे.

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यातील सामना आज ३० एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना ठीक ७.३० वाजता सुरु होईल.