rafael nadal

राफेल नदाल याने बाराव्या वेळेला बार्सिलोना ओपन स्पर्धा (rafael nadal won in barcelona open)जिंकली आहे. नदालने इल्या इवाश्का, केई निशिकोरी, कॅमेरून नॉरी आणि पाब्लो कॅरेनो बुस्टा अगुट यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

    जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने स्टीफनोस सितसिपासला ६-४, ६-७(६), ७-५ असा पराभव केला. राफेल नदाल याने बाराव्या वेळेला बार्सिलोना ओपन स्पर्धा (rafael nadal won in barcelona open)जिंकली आहे. नदालने इल्या इवाश्का, केई निशिकोरी, कॅमेरून नॉरी आणि पाब्लो कॅरेनो बुस्टा अगुट यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.


    यापूर्वी नदालने २०१८मध्ये बार्सिलोना ओपनच्या अंतिम सामन्यातही सितसिपासला हरवून विजेतेपद जिंकले होते. विजयानंतर नदाल म्हणाला, हे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. एका वर्षानंतर घरातील प्रेक्षकांसमोर खेळणे हा एक सुखद अनुभव आहे. स्टीफनोस चांगला प्रतिस्पर्धी आहे. अंतिम फेरी खूप कठीण होती.”

    नदालने आत्तापर्यंत अनेकदा ग्रँडस्लॅम जिंकले आहे.  गेल्या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर हे त्याचे यंदाचे पहिलेच विजेतेपद आहे. एटीपी ५०० स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर नदाल एकमेव खेळाडू आहे ज्याने १२ किंवा अधिक वेळा एकच स्पर्धा जिंकली आहेत.