राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, ‘या’ खेळाडूवर सोपावली नेतृत्वाची जबाबदारी

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असल्यानं श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी द्रविड अँड टीम सज्ज झाली आहे. संघातील अनुभवी फलंदाज शिखर धवन याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता अधिक आहे.

    जुलै महिन्यात भारतीय संघाची दुसरी फळी श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. हा दौरा भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षराने लिहिला जाईल कारण या दौऱ्यावर जाणाऱ्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

    टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असल्यानं श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी द्रविड अँड टीम सज्ज झाली आहे. संघातील अनुभवी फलंदाज शिखर धवन याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता अधिक आहे.

    विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ( वि. न्यूझीलंड) आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

    राहुल द्रविड मागील अनेक वर्षांपासून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याचे काम करत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 19 वर्षांखालील संघानं 2018 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता.