राजस्थानने विजयासाठी दिलं १७२ धावांचं आव्हान, मुंबईच्या बॅटिंगसाठी रोहित सेना सज्ज

जोस बटलरने ४१ तसेच शिवम दुबेने ३५धावा केल्या. तर यशस्वी जयस्वलाने ३२ धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चाहरने २ विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (arun jaitley stadium delhi) करण्यात आले आहे.

    राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मुंबई इंडिन्सला (Mumbai Indians) विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने २० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली.

    जोस बटलरने ४१ तसेच शिवम दुबेने ३५धावा केल्या. तर यशस्वी जयस्वलाने ३२ धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चाहरने २ विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (arun jaitley stadium delhi) करण्यात आले आहे. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सची टीम हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरली आहे. त्यामुळे रोहित सेना हे आव्हान आज पूर्ण करू शकेल की नाही, हे पाहणं चाहत्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.