राजस्थान रॉयल्सने केली चेन्नईवर मात
राजस्थान रॉयल्सने केली चेन्नईवर मात

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. यामध्ये वेगवान फलंदाज संजू सॅमसनची (Samson) झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली स्टिव्ह स्मिथची (Smith) साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला १६ धावांनी पराभूत करत आयपीएलच्या १३ व्या मोसमातील विजयी सलामी नोंदवली आहे.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royals Vs Chennai Superkings) या दोन संघात काल मंगळवारी सामना झाला. चेन्नईचा हा यंदाच्या मोसमातील दुसरा, तर राजस्थानचा (RR)  पहिलाच सामना होता. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Ms Dhoni) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. यामध्ये वेगवान फलंदाज संजू सॅमसनची (Samson) झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली स्टिव्ह स्मिथची (Smith) साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला १६ धावांनी पराभूत करत आयपीएलच्या १३ व्या मोसमातील विजयी सलामी नोंदवली आहे.

राजस्थानला सॅमसन आणि स्मिथ यांनी अप्रतिम सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. राजस्थानचा कर्णधार स्मिथला सॅम करनने बाद केले. स्मिथने ४७ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. राजस्थानने चेन्नईपुढे सामना जिंकण्यासाठी २१७ धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर चेन्नईचे ११ षटकांत ८६ धावांवर ४ गडी बाद झाले आहेत.

राजस्थानचा फिरकीपटू राहुल तेवातीयाच्या फिरकीपुढे चेन्नईचे खेळाडू हतबल झाले आहेत. राहुल तेवातीयाने चेन्नईचे तीन गडी बाद केले. चेन्नई संघाने पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा पराभव केला. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांच्या राजस्थान रॉयल या संघाने पराभूत करून दणदणीत विजय मिळवला आहे.