सनरायजर्स हैदराबादवर राजस्थानचा रॉयलचा ५५ धावांनी दणदणीत विजय

राजस्थानने हैदराबादला विजयासाठी २२१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १६५ धावाच करता आल्या.

    नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सने (Rajastha Royals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) ५५ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. राजस्थानने हैदराबादला विजयासाठी २२१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १६५ धावाच करता आल्या.

    हैदराबादकडून मनिष पांडेने ३१ तर जॉनी बेयरस्टोने ३० धावांची खेळी केली. राजस्थानकडून मुस्तफिजुर रहमान आणि ख्रिस मॉरीसने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.