दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचं आव्हान, कोणाचं पारडं होणार जड?

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील २३ वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. हा सामना आज शुक्रवारी (Friday) संध्याकाळी शारजाह मैदानावर खेळला जाणार आहे. तसेच हे मैदान राजस्थान रॉयल्ससाठी खूप लकी असल्याचं सांगितलं जातं. या संघाने पाच सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत.

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील २३ वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. हा सामना आज शुक्रवारी (Friday) संध्याकाळी शारजाह मैदानावर खेळला जाणार आहे. तसेच हे मैदान राजस्थान रॉयल्ससाठी खूप लकी असल्याचं सांगितलं जातं. या संघाने पाच सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेनुसार, राजस्थान हा संघ सातव्या स्थानावर आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर राजस्थानचं आव्हान आहे. त्यामुळे हा संघ सुद्धा नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करेल. दिल्ली संघाने पाचमधून चार सामने जिंकले आहेत. तर गुणतालिकेनुसार, दिल्ली हा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ६ ऑक्टोंबर रोजी राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईने ५७ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

मुंबईच्या संघाने २० षटकात १९३ धावा केल्या. राजस्थानचा संघ १३६ धावापर्यंत मजल मारू शकला. राजस्थानचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आता राजस्थानच आव्हान दिल्लीसमोर आहे. यावेळी कोणत्या संघाचं पारडं आज जड होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.