चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये रंगणार सामना
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये रंगणार सामना

चेन्नई संघाने आयपीएलच्या पहिल्याच सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI)  संघाचा पराभव केला. त्यानंतर आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्ससोबत (RR) होणार आहे.

आयपीएलच्या १३ व्या ((IPL 2020) हंगामातील चौथा सामना आज मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान ऱॉयल्स ( RR Vs CSK) यांच्यामध्ये रंगणार आहे. चेन्नई संघाने आयपीएलच्या पहिल्याच सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI)  संघाचा पराभव केला. त्यानंतर आज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघाला आयपीएलमधील पहिल्या सामन्याआधीच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. संघातील स्टार खेळाडू जॉस बटलर पहिला सामना खेळू शकणार नाही. तसेच ऑलराउंडर बेन स्टोक्सही आयपीएलच्या १३ व्या सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. परंतु, स्टिव्ह स्मिथ खेळण्यासाठी फिट असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्मिथच्या वापसीमुळे संघाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारजाहमध्ये २२ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. इंग्लंडचा स्टार खेळाजू जोस बटलरने रविवारी खुलासा केला की, तो यूएईमध्ये क्वॉरंटाईन असल्यामुळे पहिला सामना खेळू शकणार नाही. दरम्यान, आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये क्रिकेटची लढत असून हा सामना नक्की कोण जिंकणार ? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.