राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे?

हैदराबादने केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची धुरा देऊन संघात बदल होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. वॉर्नरऐवजी जेसन रॉय, मोहम्मद नबी आणि जेसन होल्डर यांचा संघात समावेश होऊ शकतो. केन विल्यमसनने याअगोदर २०१८ आणि २०१९ मध्ये हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं आहे. राजस्थानजवळ सध्या केवळ ४ विदेशी खेळाडू उरलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर हैदराबादविरुद्ध खेळताना अंतिम ११ खेळाडू निवडणं अवघड काम असेल.

    नवी दिल्ली : आयपीएलच्या १४ व्या पर्वातील २८ व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals vs Sunrisers hydrabad) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हैदराबादला नवा कर्णधार मिळाला आहे. नव्या कर्णधारासह हैदराबाद पराभवाच्या धक्क्यातून सावरतं का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

    हैदराबादने केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची धुरा देऊन संघात बदल होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. वॉर्नरऐवजी जेसन रॉय, मोहम्मद नबी आणि जेसन होल्डर यांचा संघात समावेश होऊ शकतो. केन विल्यमसनने याअगोदर २०१८ आणि २०१९ मध्ये हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं आहे. राजस्थानजवळ सध्या केवळ ४ विदेशी खेळाडू उरलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर हैदराबादविरुद्ध खेळताना अंतिम ११ खेळाडू निवडणं अवघड काम असेल.

    दरम्यान, भारतीय वेळेनुसार सामना ठीक ३.३० वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक ३ वाजता टॉस होईल.