राजीव शुक्ला यांची पुन्हा बीसीसीआयमध्ये एण्ट्री, पाहा कोणत्या पदावर झाली नियुक्ती?

राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांच्याशिवाय आयपीएल (IPL) गव्हर्निंग काऊन्सिल सदस्य होण्यासाठी ब्रजेश पेटल आणि मुजुमदार यांनी अर्ज (Application) भरला आहे. दोन पदांसाठी दोन जणांनीच अर्ज भरल्यामुळे इकडेही निवडणूक होणार नाही. हे दोघेही सध्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे (IPL Governing Council) सदस्य आहेत

काँग्रेसचे नेते (Congress Leader) राजीव शुक्ला (Rajiv Shukla) लवकरच बीसीसीआय (BCCI) चे उपाध्यक्ष होणार आहेत. उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे (UPCA) माजी सचिव राजीव शुक्ला यांनी गुरुवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात जाऊन आपलं नामांकन भरलं.

उपाध्यक्षपदासाठी शुक्ला यांच्याशिवाय कोणीही नामांकन भरलेलं नाही, त्यामुळे त्यांचं उपाध्यक्ष (Vice president) होणं निश्चित झालं आहे. २४ तारखेला अहमदाबादमध्ये (Ahmedabad)  बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, या सभेत राजीव शुक्ला यांच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत अधिकृत (Declaration) घोषणा होईल.

राजीव शुक्ला यांच्याशिवाय आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल सदस्य होण्यासाठी ब्रजेश पेटल आणि मुजुमदार (Brajesh Petal and Mujumdar) यांनी अर्ज भरला आहे. दोन पदांसाठी दोन जणांनीच अर्ज भरल्यामुळे इकडेही निवडणूक होणार नाही. हे दोघेही सध्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य आहेत, त्यामुळे ब्रिजेश पटेल आयपीएल गव्हर्निक काऊन्सिलचे अध्यक्षपदी कायम राहतिल हेदेखील निश्चित झालं.