राजस्थानचा कोलकातावर दणदणीत विजय, गुणतालिकेत शेवटच्या स्थानी झाली घसरण

कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मॉरिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे कोलकाताची गुणतालिकेत शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे.

    आयपीएलच्या १८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सला ६ गड्यांनी मात दिली. त्यामुळे कोलकाताला लीगमधील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसच्या ४ बळींमुळे कोलकाताला २० षटकात ९ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली.