तालिबान्यांना न घाबरता फिरकीपटू राशिद खानने दिला अफगाणिस्तानला पाठिंबा, संपूर्ण जग करतयं सलाम

अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू आणि फिरकीपटू राशिद खानने आपल्या देशाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. त्याच्या देशभक्तीला लोकांकडून सलाम केलं जात आहे. राशिद खान लवकरच आयपीएल २०२१ च्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.

  नवी दिल्ली: अफगाणिस्तानच्या संपूर्ण देशात तालिबान्यांनी कब्जा केला आहे. सोशल मीडियावर अफगाणिस्तानातून हृदयद्रावक असे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. येथील परिस्थीती प्रचंड प्रमाणात गंभीर आहे. तालिबानची नजर आता अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डावर आहे. त्यानंतर अनेक लोकांकडून अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमची सद्यपरिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु दिलासादायक बातमीनुसार, क्रिकेट टीम आपल्या शेड्यूल नुसार क्रिकेट खेळत राहणार आहे.

  राशिद खानच्या देशभक्तीला सलाम

  अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू आणि फिरकीपटू राशिद खानने आपल्या देशाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. त्याच्या देशभक्तीला लोकांकडून सलाम केलं जात आहे. राशिद खान लवकरच आयपीएल २०२१ च्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. सध्या तो द हंड्रेड  स्पर्धेसाठी खेळत आहे. याचदरम्यान, राशिदने सामना खेळताना असं काही केलं की, संपूर्ण जगभरातून त्याच्यावर प्रचंड प्रेम आणि सलाम केलं जात आहे.


  राशिद खान सध्या इंग्लंडमध्ये असला तरी त्याला सतत देशाची चिंता आहे. ट्रेंट रॉकेट्स विरुद्ध साऊथर्न ब्रेव्ह या लढतीसाठी राशिद मैदानात उतरला होता. त्यावेळी त्यानं त्याच्या चेहऱ्यावर अफगाणिस्तानचा झेंड्याचं चित्र काढलं होते. शुक्रवारी या स्पर्धेतील एलिमेनेटर लढतीमध्ये तो खेळण्यासाठी उतरला, त्यावेळी त्यानं मैदानातून देशाला पाठिंबा दिला.

  तालिबानकडून क्रिकेटला धोक्याची घंटा

  अफगाणिस्तानातील क्रिकेट बोर्डचे माजी मीडिया मॅनेजर आणि पत्रकार इब्राहिम मोमंद यांनी ट्विटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बंदूकांसोबत तालिबानी एका हॉलमध्ये बसल्याचं दिसत आहे. हा हॉल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मुख्यालय आहे. तसेच फोटो शेअर करत, स्वत: इब्राहिम मोमंद यांनी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण माहिती लोकांना दिली आहे.