‘या’ कारणामुळे रवींद्र जाडेजाला केलं टी-२० मालिकेतून बाहेर, जाडेजाच्या जागेवर कोणाला मिळणार संधी?

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) बॅटिंगदरम्यान हेल्मेटला लागलेला चेंडू आणि उजव्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी (India) हा मोठा धक्का समजला जात आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टी-२० (India vs Australia 1st t-20) मालिका खेळण्यात आली. यामध्ये पहिल्याच मालिकेत टीम इंडियाला यश संपादन करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. परंतु टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) बॅटिंगदरम्यान हेल्मेटला लागलेला चेंडू आणि उजव्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

रवींद्र जाडेजाला दुखापतीमुळे बाहेर काढण्यात आलं असून वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे. टी २० सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रवींद्र जाडेजा या सामन्याचा हिरो ठरला. जडेजाने २३ चेंडूत ५ फोर आणि ५ सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद ४४ धावा केल्या. दरम्यान या विजयापेक्षा मुद्दा गाजला तो जडेजाच्या (Cuncussion Substitute)कन्कशन सब्सटिट्यूटचा.

बीसीसीआयने सांगितले आहे की, इनिंग्स झाल्यानंतर ब्रेकच्या वेळेदरम्यान बोर्डाच्या मेडिकल टीमने जाडेजाची तपासणी केली होती. जाडेजाला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागेवर शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. कारण शार्दूल ठाकूर एकदिवसीय मालिकेचा भाग आहे.