आरसीबीच्या प्रशिक्षकाचा राजीनामा, रणमशीन विराट कोहलीच्या चिंतेत भर

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज कॅटिच गेल्या वर्षी संघाचे प्रशिक्षक बनले होते. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत.

    नवी दिल्ली : आरसीबीच्या प्रशिक्षकाने राजीनामा दिला असून रणमशीन विराट कोहलीच्या चिंतेत भर झाली आहे. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली संघाला एकदाही आयपीएल जिंकता आलेले नाही. त्याचबरोबर आता संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनीही राजीनामा दिला आहे. आरसीबीमध्ये बरेच बदल झाले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे.

    ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज कॅटिच गेल्या वर्षी संघाचे प्रशिक्षक बनले होते. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत.

    ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आणि फिरकीपटू अॅडम झांपा तसेच न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलन यूएईमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. यामुळे आरसीबीने ३ नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.