नातेवाईक,कुटुंबीय,गावकऱ्यांचा मीराबाई चानूच्या विजयानंतर एकाच जल्लोष

संघर्षानंतर मीराबाई चानू हिला आजचा दिवस पाहायला मिळतो आहे. त्यामुळेच, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या कुटुंबीयांनाही अत्यानंद झाला आहे.

    नवी दिल्ली: टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्याच दिवशी भारताच्या सादरीकरणाची दमदार सुरुवात झाली आहे. भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे.

    मीराबाईचा अंतिम सामना सुरु असताना गावाकडील घरात टीव्हीकडे डोळे लावून बसलले शेजारी, नातेवाईक आणि तिचे कुटुंबीय, देवाकडे सुरू असलेला धावा आणि तिच्या विजयानंतर झालेला जल्लोष कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तिच्या कुटुंबीयांनी रौप्य पदकाच्या विजयानंतर तिचं अभिनंदन करत, आनंद साजरा केला.

    टोकियोमध्ये इतिहास रचल्यानंतर मिराबाई चानूच्या मणिपूर येथील राहत्या घरी देखील जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. पण मिराबाई चानू हिचा आजवरचा प्रवास फार खडतर राहिला आहे. खूप संघर्षानंतर मीराबाई चानू हिला आजचा दिवस पाहायला मिळतो आहे. त्यामुळेच, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या कुटुंबीयांनाही अत्यानंद झाला आहे.