गुड न्यूज – आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये होणार,बीसीसीआयची युएईमध्ये उर्वरित सामने खेळवण्याची तयारी

आयपीएल २०२१(IPL 2021) चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला असेल,असे सांगितले जात आहे.

    कोरोनामुळे स्थगित झालेले आयपीएल २०२१(IPL 2021) चे १४वे सत्र आता यूएईमध्ये पूर्ण होणार आहे. नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. मात्र तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला असेल,असे सांगितले जात आहे.


    बीसीसीआयने कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे (सीपीएल २०२१) आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले नाही. सीपीएल २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान असेल. त्यामुळे ही लीग ७ ते १० दिवस अगोदर आयोजित करण्यासाठी वेस्ट इंडीज बोर्डाशी चर्चा केली जात आहे. जेणेकरून त्या लीगमध्ये खेळणारे आयपीएलचते खेळाडू यूएईत पोहोचू शकतील.

    बीसीसीआय येत्या १० दिवसांमध्ये आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करेल. बीसीसीआय अजूनही इंग्लिश खेळाडूंशी त्यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याविषयी चर्चा करत आहे. मात्र, इंग्लंड बोर्डाने आधीच सांगितले आहे, की ते आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी सोडणार नाही.